Javascript DHTML Drop Down Menu Powered by dhtml-menu-builder.com
 
 
 

प्रकाशाच्या वाटेवर

'वेध' या कार्यक्रमातून मुलांना शिक्षणासाठी विविध विषयांची माहिती मिळतेच पण मुलांना या व्यक्तीकडून काही चांगले गुणही घेता येतात. या 'वेध' परिषदेत मला या शास्त्रज्ञांकडून खूप काही शिकायला मिळाले. जर आपल्यामध्ये कोणती गोष्ट करायचे असेल, तर ती करण्यासाठी आपल्याला तळमळ, चिकाटी, जिज्ञासा असावी लागते हे आपल्याला तेजस गुप्ते यांच्याकडून शिकायला मिळते, तर १३ वर्षाच्या मायाकडून आपल्याला हे शिकायला मिळते कि, कोणतेही कार्य करण्यासाठी आपल्याला वयाची मर्यादा नसते. 

या वर्षाची हि 'वेध' परिषद खूप चांगली होती. या परिषदेमुळे मला संशोधन कसे केले जाते हे समजले. विज्ञान - तंत्रज्ञानासंबंधीची माहिती मिळाली. या 'वेध' च्या कार्यक्रमातून मला वैज्ञानिक ज्ञान प्राप्त झाले. विज्ञानविषयी मला आणखी माहिती मिळाली, त्यामुळे या 'वेध' च्या कार्यक्रमाला दरवर्षी उपस्थित राहण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 

 

- मेहेर निरगुंदीकर

   

 
 
 

वेध वर्तमानातील भविष्याचा

२१ सप्टेंबर २०१३ मधील पुणे येथील 'वेध' कार्यक्रम झाला तो अविस्मरणीय असा म्हणावा लागेल. कारण या वेध मधील सर्वच व्यक्ती उतुंग व्यक्तिमत्व लाभलेल्या होत्या आणि उत्तुंग व्यक्तिमत्वातील वैविध्यपूर्ण ऐकायला मिळाल्या. काहिचे कर्तृत्व पाणी, काहींचे जंगल, अवकाश आणि अंधारातून प्रकाशवाटा शोधणारे असे कर्तृत्व पाहून अचंबित व्हायला होतं. 

कोकणातल्या ग्रामीण भाग लक्षात घेता विद्यार्ध्यांची बुद्धिमत्ता, त्यांची धडपड आणि जिद्द इ. बाबतीत बरेचसे विद्यार्थी प्रयत्नशील दिसतात. परंतु त्यांची झेप म्हणावी तेवढी उंच जात नाही. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी तीनही घटक एकत्र येऊन कार्य केले तरी मर्यादा येतात, त्या बाह्य गोष्टीच्या. येथील वातावरण आणि मर्यादित सुविधा लक्षात घेतल्यास पुण्यासारख्या मोठया शहरांपेक्षा कितीतरी मागे आहोत हे लक्षात येते, परंतु ह्याची जाणीव ठेऊन मला असे वाटते कि वर्तमानातील भविष्याचा वेध घेणारी संस्था आहे. जी यामध्ये मोलाची भर घालते आहे. २०१३ अखेर ठाणे, पुणे व लातूर इ. ठिकाणच्या 'वेध' चे एकूण ४१ कार्यक्रम झाले ते कार्यक्रम सर्वांना खूप मोठी प्रेरणा देऊन जातात. मग तो शिक्षक असो, पालक असो, विद्यार्थी तर आहेच, परंतु सर्वांनाच अत्यंत प्रेरणादायी व स्फुर्तिदायी असा हा कार्यक्रम आयोजित केला जातो. जीवनातील प्रत्येक व्यक्ती स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी खूप धडपडत असते. जाणीवपूर्वक स्वतःचे व्यक्तिमत्व जोपासण्याकरता ते जास्त प्रभावी बनविण्यासाठी विविध पैलू निर्माण करण्यासाठी या 'वेध' सारखा कार्यक्रम अतिशय उत्तम वाटतो. पुणे येथेल वेधला प्रत्यक्ष उपस्थित राहणे हे दातार क्लासचे श्री. श्रीरंग बापट सर यांच्या प्रयत्नाने श्यक्य झाले. त्या वेधमधील लेफ्ट. कर्नल श्री. श्रीकांत दोंदे सर, लेफ्ट. कर्नल श्री. अभिलाष टॉमी, रोहिणी राऊत, शीतल महाजन, डॉ. कृषमेध कुंटे आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व ठरले ते म्हणजे सॅब्रिए टेंबरकेन हिचे ही सर्वच व्यक्तिमते आम्हाला कायम प्रेरणा देणारी, आम्हा सर्वांमध्ये ऊर्जा निर्माण करणारी ठरतील. दुर्गम भागातील तसेच खेडेगावतील एखादा विद्यार्थी हा कार्यक्रम पाहून निश्चित उत्कृष्ट प्रयत्न करू शकेल............

 

- राजकुमार मगदुम

   

 
 
 

NEXT PAGE  |


 


       

       
 

Home  |  About Vedh  |  Vedh Centers  |   Faculties  |  Vedh In Your City  |  Future Vedh  |  Testimonials  |  DVD  |  Media Download  |

 

This is a flagship event of IPH running successfully for more than two decades.
VEDH is a career perspective conference which IPH started organizing way back in 1991.
VEDH Thane will have its 23rd edition in December 2014. IPH with respective partners now organizes VEDH at Ahmednagar (8yrs.), Pune (3 yrs), Latur (3 yrs), Aurangabad (7yrs) and Nashik (3 yrs), Nagpur (2 yrs)........

 
 

+ More

About Vedh   Vedh Centres  


Vedh Faculties   Vedh In Your City  


Future Vedh   Testimonials  


DVD   Download PDF  

9th Floor, Shree Ganesh Darshan, LBS Marg, Naupada, Thane (west) - 400602,
Maharashtra, INDIA

Tel:
+91 22 2543 3270 / 2536 6577 / 2542 8183
 

Email :

  © Copyright 2016 Vedhiph. All Rights Reserved.  

Designed & Develped By Marathe Infotech Pvt. Ltd.